"चक्काजाम'मुळे 360 कोटींचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

मुंबई - "जीएसटी'तील गोंधळ, डिझेलचे दर आणि "आरटीओ'च्या कथित भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी मालवाहतूकदारांनी पुकारलेले "चक्काजाम' आंदोलन पहिल्या दिवशी यशस्वी झाल्याचा दावा संघटनांनी केला आहे. 

मुंबई - "जीएसटी'तील गोंधळ, डिझेलचे दर आणि "आरटीओ'च्या कथित भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी मालवाहतूकदारांनी पुकारलेले "चक्काजाम' आंदोलन पहिल्या दिवशी यशस्वी झाल्याचा दावा संघटनांनी केला आहे. 

या आंदोलनामुळे राज्यभर मालवाहतूक करणाऱ्या बारा लाख गाड्या बंद होत्या. परिणामी 360 कोटींचे नुकसान झाल्याचा दावाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. "बॉम्बे गुड्‌स ट्रान्स्पोर्ट असोसिएशन'' (बीजीटीए), "ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट असोसिएशन', "महाराष्ट्र ट्रक लॉरी मालक असोसिएशन' आदी संघटनांनी आज आणि उद्या (ता. 10) "चक्काजाम' आंदोलन पुकारले आहे. मुंबईत ये-जा करणारी एक लाख मालवाहने आज बंद राहिली. त्यामुळे 30 कोटींचे नुकसान झाले, असा दावा "ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेस'च्या कोअर कमिटीचे अध्यक्ष बाळ मलकित सिंग यांनी केला. आंदोलन उद्याही सुरूच राहणार असल्याचे सिंग यांनी सांगितले.

Web Title: maharashtra news GST