आरोग्य जनजागृतीसाठी सरकार सरसावले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

सोलापूर - राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध आरोग्य संदेशाचे आरोग्य साहित्य तयार करून जिल्ह्यांना पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, नियमित लसीकरणाविषयी राज्यात जागृती करण्यात येणार आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे यासाठीच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माहितीचे फलक व इतर साहित्याची छपाई करून जिल्ह्यांना पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी सरकारने ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. डेंगी, हिवताप, स्तनपान, मुलींच्या विवाहाचे योग्य वय, गर्भनिरोधक साधणे, किशोरवयीन मुला-मुलींकरिता माहिती, अवयवदान जागृती, जन्म-मृत्यू नोंदणी, पुरुष नसबंदी याविषयी जागृती करण्यात येणार आहे.

यासोबतच नियमित लसीकरणाविषयी जागृती करण्यात येणार आहे. राज्यातील निवडक जिल्हा व तालुक्‍याच्या ठिकाणी एसटी स्टॅंडवरील फलकांवर नियमित लसीकरणाविषयी संदेश लावण्यात येणार आहेत. राज्यात मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या बस व एसटी मंडळाच्या बसवर लसीकरणाचे फलक लावण्यात येतील. तसेच, दूरदर्शन व खासगी वृत्तवाहिन्या, मनोरंजन वाहिन्यांच्या माध्यमातून नियमित लसीकरणाच्या माहितीचा प्रसार करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.

Web Title: maharashtra news health state government