आंतरजातीय विवाह करणारे होणार लखपती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

६६ जोडप्यांना मिळाले ३३ लाख रुपये
विवाह नोंदणी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार एकट्या नागपूरमधून सव्वा वर्षात ६६ जोडप्यांना लाभ मिळाला. २०१५ मध्ये ५२ तर २०१६ मध्ये १४ जोडप्यांनी विवाह नोंदणी कार्यालयात विवाह केले. ६४ जोडप्यांना ३३ लाख राज्य सरकारकडून देण्यात आले.

मुंबई - आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आता तीन लाखांचा मदत निधी मिळणार आहे. त्यासाठी सरकारतर्फे ५० हजाराचे अनुदान दिले जाणार आहे. तसेच आंबेडकर फाऊंडेशनतर्फे अडीच लाख असे एकूण तीन लाख रुपये मदत निधी मिळणार आहे. त्यासाठी  विवाह नोंदणी कार्यालयात (कोर्ट मॅरेज) विवाह आणि अनुसूचित जातीतील मुलगा किंवा मुलीने बाह्यजातीतील मुलाशी किंवा मुलीशी विवाह करण्याची अट आहे. 

दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह विवाह नोंदणी कार्यालयाद्वारे केले आहेत. त्यातील काही जोडप्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, समाजातील जातीभेद दूर करण्याच्या उद्देशाने आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन म्हणून मदत केली जाते. अभियानात आता नागपूरच्या आंबेडकर फाऊंडेशननेही सहभाग नोंदविला आहे. राज्य सरकारकडून धनादेश अंदाजे दोन-तीन महिन्यांत मिळतो; मात्र आंबेडकर फाऊंडेशनकडून निधी मिळविण्यासाठी खटाटोप करावा लागणार आहे.

Web Title: maharashtra news Inter-caste marriages