नदीत अडकलेल्या कुटुंबाची थरारक सुटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

जुन्नर - पुणे-नाशिक राज्यमार्गावरील पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील कुकडी नदीवरील पुलाखाली नदीपात्रात अडकलेल्या कुटुंबास सुरक्षितपणे बाहेर काढण्यात पोलिस व माजी सैनिक रमेश खरमाळे यांना सुमारे एक तासाच्या थरारक प्रयत्नांनंतर यश आले.

उंचखडक (ता. अकोले, जि. नगर) येथील भिवा हरिभाऊ दुधवडे (वय ५०), त्यांची पत्नी पुष्पा (वय ४०) व मुलगी पूजा (वय १०) हे कुटुंब आळेफाटा परिसरात मोलमजुरी करण्यासाठी आले आहे. राहण्यासाठी घर नसल्याने दिवसभर मोलमजुरी करून रात्रीच्या वेळी ते नदीपात्रातील पुलाच्या लेअरवर मुक्‍काम करत असत. संततधार पावसामुळे येडगाव धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास नदीपात्रातील पाणी वाढू लागले. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरवात केली. याबाबत माजी सैनिक रमेश खरमाळे यांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर क्रेनच्या मदतीने या कुटुंबाची सुटका करण्यात आली. 

Web Title: maharashtra news junnar kukadi river

टॅग्स