अक्षम्य विश्वासघात काल रात्री झाला: किसान सभा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

संप मागे घेण्याचा निर्णय एकतर्फी करण्यात आला. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या वाटाघाटीचा निषेध करतो. लाखो शेतकरी ज्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले त्यातील एकही मार्गी लावली नाही. 

मुंबई - शेतकऱ्यांचा ऐतिहासिक असा हा संप आजही सुरुच आहे. आमच्यासोबत अक्षम्य विश्वासघात हा काल रात्री करण्यात आला, अशी जोरदार टीका अखिल भारतीय किसान सभेने आज (शनिवार) केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किसान क्रांती मोर्चातील सदस्यांमध्ये आज पहाटेपर्यंत झालेल्या बैठकीनंतर शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याचे जाहीर झाले. मात्र, त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या संपात फूट पडल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमधील व्यवहार अद्याप बंदच आहेत. किसान सभेने अद्याप बंद सुरुच असल्याचे म्हटले आहे. किसान सभेने आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यावर टीक केली व शेतकऱ्यांचा संप सुरुच असल्याचे स्पष्ट केले.

अखिल भारतीय किसान सभेचे अशोक ढवळे यांनी सांगितले, की संप मागे घेण्याचा निर्णय एकतर्फी करण्यात आला. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या वाटाघाटीचा निषेध करतो. लाखो शेतकरी ज्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले त्यातील एकही मार्गी लावली नाही. मुख्यमंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
ऐतिहासिक शेतकरी संपात 48 तासात फूट; एक गट संपावर ठाम
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गंडवलं: शरद पवार
शेतकरी संपाबाबत घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप : जयाजी सूर्यवंशी​
चोपडा: भाजीपाला फेकला रस्त्यावर
शेतकऱ्यांचा संप मागे; कर्जमाफीसाठी समिती 
शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आश्वासने
शेतकऱ्यांच्या पदरात पडले काय?; किसान सभा असमाधानी
सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्याने संप मागे: धोर्डे​

मेनका गांधी रुग्णालयात दाखल

Web Title: maharashtra news kisan sabha criticized Devendra Fadnavis on farmers strike