भीमा-कोरेगाव दंगल सरकार पुरस्कृत - राधाकृष्ण विखे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

मुंबई - कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला झालेला हिंसाचार हा सरकार पुरस्कृतच होता, असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला. मंत्रालयासमोरील सरकारी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

मुंबई - कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला झालेला हिंसाचार हा सरकार पुरस्कृतच होता, असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला. मंत्रालयासमोरील सरकारी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

कोरेगाव भीमा प्रकरणात गृह खात्याची अक्षम्य निष्क्रियता आणि अपयश पुन्हा एकदा अधोरेखीत झाल्याची टीका करताना विखे-पाटील म्हणाले की, वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई झाली असती तर पुढील अप्रिय घटना टाळता आल्या असत्या. पण सरकार ते करू शकले नाही. कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराची पार्श्वभूमी अनेक दिवसांपासून तयार केली जात होती. पण गृह खाते अन्‌ गुप्तचर विभाग झोपलेले होते. हिंसाचार सुरू झाल्यानंतरही सरकारने काहीच केले नाही. हा हिंसाचार म्हणजे सरकार पुरस्कृत दंगल होती. मराठा व दलित समाजात तेढ निर्माण करण्याचे हे कारस्थान होते, असा ठपकाही त्यांनी ठेवला. 

मुख्यमंत्र्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची नैतिकता नाही. परंतु, कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर त्यांनी गृह खाते सोडायला हवे. कायदा व सुव्यवस्थेबाबत निष्क्रियता व हलगर्जी केल्याबद्दल राज्याचे पोलिस महासंचालक, पुणे रेंजचे विशेष पोलिस महानिरीक्षक आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांना निलंबित करावे. कोरेगाव भीमाची चौकशी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत आणि उच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: maharashtra news koregaon bhima Riot radhakirshna vikhe patil