जनावरांच्या उपचारासाठी 389 मोबाईल व्हॅन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

मुंबई - आजारी जनावरांवर उपचार करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला अत्याधुनिक सोईसुविधांनी सज्ज असलेल्या 389 मोबाईल व्हॅन मिळणार आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली. 

मुंबई - आजारी जनावरांवर उपचार करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला अत्याधुनिक सोईसुविधांनी सज्ज असलेल्या 389 मोबाईल व्हॅन मिळणार आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली. 

जानकर म्हणाले, की पशुपालकांनी जनावर आजारी असल्याचा दूरध्वनी केल्यास ही मोबाईल व्हॅन त्यांच्या घरी जाईल आणि पशुवैद्यक जनावरांवर उपचार करतील. जनावरांना जागेवरच उपचार मिळणार असल्याचे त्यांचा वेळ आणि त्रास वाचणार आहे. या व्हॅनची किंमत 24 लाख रुपये आहे. तेलंगणमधील मोबाईल व्हॅनपेक्षाही या व्हॅनमधील सुविधा अत्याधुनिक आहेत. कृषी विकासाच्या दरापेक्षा पशुसंवर्धनाचा दर अधिक आहे. या विभागाला पुरेसा निधी दिल्यास राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणार नाही. 

"दुग्धविकास'मध्ये लातूरमधील 349 गावे 
राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या प्रकल्पात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, लातूर, चाकूर, रेणापूर आणि औसा या पाच तालुक्‍यांचा समावेश झाला आहे. या पाच तालुक्‍यांतील 349 गावांमध्ये दुग्ध उत्पादनाला चालना देणे, मदर डेअरी प्रकल्प राबवणे; तसेच शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळवून देणे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे जानकर यांनी सांगितले.

Web Title: maharashtra news mahadev jankar mobile van