कृषी विद्यापीठाची १३ हेक्‍टर जागा महामेट्रोला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) या कंपनीकडून पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प केला जात आहे. त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची १३ हेक्‍टर २९ गुंठे जमीन देण्याचे नियोजित आहे. सद्यःस्थितीतील फळबागा पुनर्रोपण केल्यानंतरच ती हस्तांतरित केली जाईल, असे लेखी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिले.

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रश्नोत्तर सत्र सुरू करण्यास परवानगी दिली. त्या वेळी जयदेव गायकवाड यांनी यासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘‘महामेट्रो कंपनीकडून पुणे मेट्रो प्रकल्प केला जात आहे. त्यामध्ये कृषी महाविद्यालयाची १३ हेक्‍टर २९ गुंठे जागा देण्याचे नियोजित आहे. त्याला अंतिम मंजुरी दिली असून, सद्यःस्थितीतील फळबागांचे पुनर्रोपण केल्यानंतर ही जमीन हस्तांतरित केली जाईल.’’

म्हाडाची जागा पालिकेला
विमाननगर येथील म्हाडाच्या जागेवर अतिक्रमण केले जात असल्याचे जून महिन्यात निदर्शनास आले. त्यासंदर्भात सदस्य अनिल भोसले यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर लेखी उत्तर देताना गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता म्हणाले, ‘‘म्हाडाच्या वसाहतीशेजारील मोकळ्या जागेत कुंपण घालून अतिक्रमण केले जात होते. त्या मोकळ्या जागा विकसनासाठी पुणे महापालिकेला देण्यात येणार आहेत. जागा हस्तांतर प्रक्रिया म्हाडा आणि महापालिका यांच्या स्तरावर सुरू आहे.’’

Web Title: maharashtra news mahametro