पुणे जिल्ह्यात ‘रास्ता रोको’, मोर्चे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

दौंड शहर आणि भवानीनगर येथे किरकोळ तोडफोडीच्या घटना घडल्या. जिल्ह्यात अन्यत्र शांततेत ‘बंद’ पाळण्यात आला. ‘बंद’च्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे काही किरकोळ प्रकार वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

खेड शिवापूर ‘रास्ता रोको’
खेड शिवापूर  : पुणे- सातारा महामार्गावर खेड शिवापूर (ता. हवेली) येथील बंगला चौकात हवेली, भोर, वेल्हे येथील भीम सैनिकांच्या वतीने बुधवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर झालेल्या या आंदोलनामुळे पुणे- सातारा रस्त्यावर काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. 

मंचरला ‘रास्ता रोको’
मंचर  : जाळपोळ व दगडफेक करणाऱ्यांना ताबडतोब अटक करावी, या मागणीसाठी पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) येथे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी रास्ता  रोको आंदोलन केले. तसेच घटनेचा निषेध केला. 

बारामतीत मोर्चा 
बारामती  - शहरात आज कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. या मोर्चास अनेक संस्था व संघटनांनी पाठिंबा दर्शविला. विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारीही या मोर्चात सहभागी झाले होते. एसटीने आपली सेवा बंद ठेवली होती. 

जुन्नरला बंद व ‘रास्ता रोको’
जुन्नर  - जुन्नर येथे आंबेडकरवादी संघटनांनी निषेध मोर्चा काढून नवीन एसटी बस स्थानकासमोर तासभर रास्ता रोको आंदोलन केले. व्यापाऱ्यांनी बंद पाळला. शासकीय, निमशासकीय कार्यालये, बॅंका, शाळा, महाविद्यालये यांचे कामकाज सुरू होते. बाजारपेठा बंद होत्या.

भवानीनगरला हिंसक वळण
भवानीनगर  - कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी सकाळी शांततेत सुरू झालेल्या बंदला बाहेरून आलेल्या आंदोलकांमुळे हिंसक वळण लागले. अकलूज डेपोच्या बसच्या काचा या आंदोलकांनी फोडल्यानंतर येथे तणाव निर्माण झाला. दरम्यान, आज सणसर, भवानीनगर, बेलवाडी, जाचकवस्तीसह आदी सर्वच भागांत बंद पाळण्यात आला.

Web Title: maharashtra news Maharashtra Bandh Koregaon Bhima Clash