राज्याबाहेरचे लोक तणाव निर्माण करतात! - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

मुंबई - ""आम्ही राज्याला जातीयवादापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. विकासाच्या आधारावरच राज्याची घोडदौड सुरू राहील, अशी आमची निष्ठा असताना बाहेरचे काही लोक येथे तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. कोरेगाव भीमा येथील घडामोडी, तसेच त्यानंतर आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. 

हिंदी पत्रकार संघाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, ""ज्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत, विकासाशी देणेघेणे नाही, असे नेते बाहेरून येऊन राज्यात तणाव निर्माण करतात. राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत; मात्र जनतेची विकासावर निष्ठा असल्याने हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.'' 

मुख्यमंत्री दिवसभर "वर्षा' निवासस्थानावरून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. दिल्लीतील गृह मंत्रालयाशीही मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी दिवसभर संपर्कात होते.

Web Title: maharashtra news Maharashtra Bandh Koregaon Bhima Clash devendra fadnavis