भवानीनगर एस.टी.बसवर दगडफेक केल्याप्रकरणी ४० जणांवर गुन्हा दाखल

राजकुमार थोरात
बुधवार, 3 जानेवारी 2018

वालचंदनगर - भवानीनगर (ता.इंदापूर) येथे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटीबसचे  दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी ४० जणांवर गुन्हा दाखल केला असून दगडफेकमध्ये बसचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले.

वालचंदनगर - भवानीनगर (ता.इंदापूर) येथे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटीबसचे  दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी ४० जणांवर गुन्हा दाखल केला असून दगडफेकमध्ये बसचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले.

याप्रकरणी बसचे चालक धनाजी श्रीपती लोंखडे (वय ५६, रा.माळशिरस,जि. सोलापूर) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आज बुधवार (ता.३) राेजी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एमएच ४०- वाय ५०३५ ही अकलूज -नाशिक बस भवानीनगर मार्ग बारामतीला निघाली होती. सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास भवानीनगर बसस्थानकाजवळ प्रवाशांना घेण्यासाठी थांबली असताना अचानक ३५ ते ४० जणाच्या जमावाने बसवरती दगडफेक केल्याने बसच्या काचा फुटून बसचे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. पोलिसांनी चाळीस जणावर बसचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून यामध्ये २५ जणांच्या नावाचा समावेश असून अज्ञात १५ जणांवर गुन्हा दाखल आहे.

तपास साहय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे करीत अाहेत.

Web Title: maharashtra news Maharashtra Bandh Koregaon Bhima Clash ST bus crime indapur