मंत्रालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जानेवारी 2018

मुंबई - औष्णिक विद्युत निर्मितीसाठी जमीन संपादित करताना महानिर्मितीने 1 हेक्‍टर जागेचा मोबदला केवळ 2 लाख 18 हजार रुपये इतकाच देत शेतकऱ्यांच्या हातावर तुरी ठेवण्याचा प्रयत्न महानिर्मितीच्या अंगलट येणार आहे. धर्मा पाटील या 84 वर्षांच्या शेतकऱ्याने या तुटपुंज्या मोबदल्याच्या विरोधात मंत्रालयात दाद मागण्याचा सातत्याने प्रयत्न करूनही त्यांना कोणी दाद दिली नसल्याने त्यांनी मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न काल केल्याने ऊर्जा विभागात खळबळ उडाली आहे.

मुंबई - औष्णिक विद्युत निर्मितीसाठी जमीन संपादित करताना महानिर्मितीने 1 हेक्‍टर जागेचा मोबदला केवळ 2 लाख 18 हजार रुपये इतकाच देत शेतकऱ्यांच्या हातावर तुरी ठेवण्याचा प्रयत्न महानिर्मितीच्या अंगलट येणार आहे. धर्मा पाटील या 84 वर्षांच्या शेतकऱ्याने या तुटपुंज्या मोबदल्याच्या विरोधात मंत्रालयात दाद मागण्याचा सातत्याने प्रयत्न करूनही त्यांना कोणी दाद दिली नसल्याने त्यांनी मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न काल केल्याने ऊर्जा विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान, धर्मा पाटील यांना 10 लाख प्रतिहेक्‍टर तसेच जानेवारी 2012 पासून व्याज देण्याचा महानिर्मिती विचार करत असल्याची सारवासारव ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आली. 

सोमवारी रात्री मंत्रालयाच्या परिसरात धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या 84 वयाच्या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून जेजे रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलविण्यात आल्याची माहिती त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी दिली. 

दरम्यान, जमीन अधिग्रहण कायदा 2013 नुसार 2015 मध्ये धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या मोबदल्याबाबतचा निवाडा करण्यात आल्याची माहिती महानिर्मितीने दिली आहे. त्यानुसार धर्मा पाटील यांच्या एक हेक्‍टर जमिनीसाठी केवळ 2 लाख 18 हजारांचा मोबदला देण्यात आला होता, हे बावनकुळे यांनी मान्य केले. तसेच हा प्रकार घडल्यानंतर त्यांना वाढीव मोबदला मिळावा, याचा सरकार विचार करत असल्याचे सांगितले. 

Web Title: maharashtra news mantralaya Farmer suicide case