मंत्रालयात शुकशुकाट! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

मुंबई - भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने बुधवारी पाळण्यात आलेल्या "महाराष्ट्र बंद'चा परिणाम मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर आणि अभ्यागतांवर झाला. जेमतेम 20 ते 25 टक्‍क्‍यांच्या आसपास कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

राज्यात आणि मुंबईत काही अपवाद वगळता बंद शांततेत पार पडला असला, तरी आज सकाळपासूनच रस्ते आणि उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने मंत्रालयातील कर्मचारी वेळेत पोचू शकले नसल्याने केवळ 20 ते 25 टक्के एवढीच कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीनंतरच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील विविध भागांतील लोक आपल्या कामानिमित्त मंत्रालयात येतात. मंत्रालयात प्रवेशासाठी तीन प्रवेश पास खिडक्‍यांवर आज तुरळक गर्दी होती. "बंद'च्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आणि परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनुचित प्रकार घडू नये म्हणून तैनात करण्यात आलेल्या फौजफाट्यामुळे मंत्रालय परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

Web Title: maharashtra news mantralaya Maharashtra Bandh Koregaon Bhima Clash