मराठा आरक्षणासाठी निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

नागपूर - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या आमदारांनी आज विधानसभेच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. 

नागपूर - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या आमदारांनी आज विधानसभेच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. 

‘‘आरक्षणासाठी मराठा समाजातील लोक लाखोंच्या संख्येने मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले. या नंतर तरी सरकार मराठ्यांना आरक्षण देणार अशी अपेक्षा होती. मात्र सरकारने आरक्षण दिले नाही. मराठा पेटला तर राज्यात शांतता राहणार नाही, उद्रेक होणार. याची दखल सरकारने घ्यावी,’’ असा इशारा शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला. ‘‘सरकार मराठ्यांच्या आरक्षणाच्या विषयावर काहीही बोलण्यास तयार नाही, सरकारला याचा विसर पडला की काय, म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण आहे. अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी पुरेपूर प्रयत्न आहे. भाजपमधीलही काही आमदार खासगीत आरक्षणाच्या मुद्द्यावर आमच्या सोबत आहेत. मात्र ते पुढे येत नाहीत,’’ असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: maharashtra news maratha reservation MLA winter session