'मराठीच्या अभिजात दर्जासाठी पाठपुरावा करणार'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

मुंबई - मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे दबाव वाढवावा, असे साकडे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना घातले. याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन गडकरी यांनी या वेळी दिले. 

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी रंगनाथ पाठारे यांच्या समितीने सर्व बाबांची पूर्तता केली, तरीही हा प्रस्ताव सरकारदरबारी धूळ खात पडून होता. त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेने लोकचळवळ सुरू केली. त्यानंतर केंद्र सरकारकडून हालचाली सुरू झाल्या. या संदर्भातील काम अंतिम टप्प्यात असल्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून सांगण्यात आले, तरी या प्रकरणी गडकरींनी लक्ष घालावे, अशी मागणी या शिष्टमंडळाने गडकरींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन केली. या शिष्टमंडळात "मसाप'चे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, आमदार शिवेंद्रराजे भोसले, विनोद कुलकर्णी, राजन लाखे, सचिन जाधव, अविनाश कदम आदींचा समावेश होता. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी मसापच्या सर्व शाखांनी पत्र मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत एक लाखाहून अधिक पत्रे केंद्र  सरकारकडे पाठविण्यात आली आहेत. 

Web Title: maharashtra news marathi nitin gadkari