गणित ऐच्छिक होऊ शकतो का? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

मुंबई - गणित आणि भाषा विषयात अनुत्तीर्ण झाल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे गणितासारखा विषय ऐच्छिक होऊ शकतो का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. विद्यार्थ्यांना निदान कला शाखेतून तरी पदवीपर्यंत शिक्षण घेता येईल. याबाबत तज्ज्ञांची मते जाणून घेऊन 26 जुलैला पुढील सुनावणीत भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश न्यायालयाने शिक्षण मंडळाला दिले. 

सामान्य मुलांपेक्षा संथ गतीने शैक्षणिक प्रगती करणाऱ्या मुलांची समस्या लहान वयातच जाणून घेऊन त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, या मुद्‌द्‌यावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी उच्च न्यायालयाला लिहिलेल्या पत्राची दखल घेत सुमोटो याचिका दाखल करून घेण्यात आली आहे. न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. 90 टक्के विद्यार्थी गणित आणि भाषा विषयात नापास होतात. त्यामुळे हे विषय पर्याय ठेवल्यास विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. कला शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित विषयाचा काय उपयोग होतो, असा प्रश्‍नही न्या. मेनन यांनी विचारला. 

जुन्या पर्यायावर तज्ज्ञांची मते घ्या 
1975 पर्यंत गणित विषय वगळून दहावीची परीक्षा देता येत होती. सामान्य गणिताऐवजी संस्कृत विषयाचा पर्याय होता. एका विषयात अनुत्तीर्ण झाले तरी अकरावीला प्रवेश मिळत होता. मग, ही पद्धत का बंद करण्यात आली, हा जुना पर्याय पुन्हा सुरू करता येईल का, असे प्रश्‍न न्या. कानडे यांनी विचारले. त्यामुळे राज्यातील शिक्षण मंडळांनी या मुद्‌द्‌यावर तज्ज्ञांची मते विचारात घ्यावीत, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. 

Web Title: maharashtra news math subject