म्हाडाची सोडतीतील घरे 40 टक्‍क्‍यांनी स्वस्त 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई - म्हाडाच्या लोअर परेल येथील घरांच्या किमती सुमारे दोन कोटी असल्याने ती सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात नसल्याची टीका होऊ लागल्यामुळे या घरांच्या किमती बाजारभावापेक्षा 30 ते 40 टक्‍क्‍यांनी कमी असल्याचा दावा म्हाडाने केला आहे. 

म्हाडाच्या 819 सदनिकांच्या विक्रीची सोडत 10 नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे. या सोडतीतील लोअर परेल येथील घरांची किंमत 1 कोटी 95 लाख 67 हजार 103 आहे. याबाबतचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी सोडतीमधील घरांच्या किमती बाजारभावापेक्षा कमी असल्याचे स्पष्ट केले आहे. 

सायन प्रतीक्षानगर येथील घरांच्या किमती बाजारभावापेक्षा 64 टक्के, मागाठाणे- बोरिवली येथील 70 टक्के, गोरेगाव उन्नतनगर येथील सुमारे 47 टक्‍क्‍यांनी कमी असल्याचा दावा लाखे यांनी केला. लोअर परेल येथील घरे मोक्‍याच्या ठिकाणी आहेत. या घरांची विक्री चटई क्षेत्रानुसार होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: maharashtra news mhada