मराठवाड्यात सूक्ष्म सिंचन क्रांती

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

मुंबई - सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवारनंतर आता मराठवाड्यात सूक्ष्म सिंचनाची क्रांती करण्याचा निर्धार सरकारने व्यक्त केला आहे. पुढील तीन वर्षांत या विभागातील शंभर टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणताना पाण्याची बचत आणि भरपूर उत्पादन असे सूत्र समोर ठेवून सरकारने सूक्ष्म सिंचनावर पहिल्या टप्प्यात 143 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी वितरित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 

राज्य सरकारने 14 ऑक्‍टोबर 2016 ला मराठवाड्यात 100 टक्के राज्यपुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना घोषित केली होती. 2016-17 ते 2018-19 या तीन वर्षांसाठी सुमारे 337 कोटींची तरतूद केली. सन 2017-18 या वर्षात सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 143 कोटी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी 100 कोटी 45 लाखांचा निधी वितरित करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Web Title: maharashtra news Micro Irrigation Revolution in Marathwada

टॅग्स