अभिनेते मोहन जोशी यांचा अर्ज बाद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून, मावळते अध्यक्ष मोहन जोशी यांचा अर्ज बाद झाल्याने नाट्य परिषद निवडणुकीला वेगळेच वळण लागले आहे. नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी परिषदेकडे महाराष्ट्रभरातून एकूण 193 अर्ज आले होते. त्या अर्जांची छाननी निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. सोमवारी सायंकाळी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. दीपक करंजीकर यांचा अर्ज पात्र ठरतो की अपात्र, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच मोहन जोशी यांचा अर्ज बाद झाल्याने निवडणुकीलाच मोठी कलाटणी मिळाली आहे.

मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून, मावळते अध्यक्ष मोहन जोशी यांचा अर्ज बाद झाल्याने नाट्य परिषद निवडणुकीला वेगळेच वळण लागले आहे. नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी परिषदेकडे महाराष्ट्रभरातून एकूण 193 अर्ज आले होते. त्या अर्जांची छाननी निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. सोमवारी सायंकाळी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. दीपक करंजीकर यांचा अर्ज पात्र ठरतो की अपात्र, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच मोहन जोशी यांचा अर्ज बाद झाल्याने निवडणुकीलाच मोठी कलाटणी मिळाली आहे. मावळते अध्यक्ष आणि यंदाच्या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार म्हणून ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्याकडे पाहिले जात होते. 

Web Title: maharashtra news mohan joshi