मॉन्सून  पुन्हा सक्रिय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठी विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा नैॡत्य मौसमी पाऊस (मॉन्सून) सक्रिय होण्याचे संकेत हवामान खात्याने आज दिले. मॉन्सूनच्या पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होत असल्याने येत्या शनिवारी कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाजही खात्याने वर्तविला आहे.

पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठी विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा नैॡत्य मौसमी पाऊस (मॉन्सून) सक्रिय होण्याचे संकेत हवामान खात्याने आज दिले. मॉन्सूनच्या पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होत असल्याने येत्या शनिवारी कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाजही खात्याने वर्तविला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. सध्या कोकणातील काही भागात हवेचा दाब कमी असल्याने अनेक ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहेत. कोकणाच्या बहुतांश गुरुवारी (ता. १७) भागांत हलका ते मध्यम, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे परिसरातही हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्‍यता आहे. 

कोकणातील बुधवारी काही ठिकाणी हलका पाऊस पडला, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी ऊन पडले होते. त्यामुळे हवामानात दमटपणा वाढला असून, कमाल तापमानात वाढ झाली. कोकणातील हर्णे, खालापूर, अंबरनाथ, बेलापूर, कल्याण या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या पावसाने हजेरी लावली. उर्वरित काही ठिकाणी हलका पाऊस पडला असून, काही भागांत ढगाळ हवामान होते. तर लोणावळा, अंबोणे, डुंगरवाडी, भिरा, शिरगाव, ताम्हिणी या घाटमाथ्यावर हलका पाऊस पडला. 

मध्य महाराष्ट्रात सांगोला, जामखेड, आटपाडी, कवठेमहाकाळ, लोणावळा येथेही पावसाच्या अधूनमधून सरी कोसळल्या. मराठवाड्यातील कळंब, परंडा, बदलापूर, परतूर, तुळजापूर, उदगीर येथेही हलका पाऊस पडला. विदर्भात पावसाची नोंद झाली आहे.

तुरळक भागात जोर वाढणार
कमी दाबाचा पट्टा सध्या हिमालयाच्या पायथ्याशी आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर हवेचा जास्त दाब आहे. त्यामुळे उत्तर भारतात पावसाचा जोर वाढला आहे. पण, महाराष्ट्रातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील तुरळक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता असल्याचेही हवामान शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले. 

Web Title: maharashtra news monsoon rain