वीजखरेदीचा ग्राहकांवर २०० कोटींचा बोजा

वीजखरेदीचा ग्राहकांवर २०० कोटींचा बोजा

मुंबई - कोळशाच्या पुरवठ्याअभावी निर्माण झालेल्या वीज भारनियमनाच्या संकटावर मात करण्यासाठी महावितरण कंपनीने खुल्या बाजारातून रोज १ हजार ४७० मेगावॉट विजेची खरेदी करण्यास सुरवात केली आहे. ही वीजखरेदी महिनाभर चालणार असून, त्यासाठी महावितरणला अंदाजे २०० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. अर्थात या वीजखरेदीचा बोजा अंतिमतः ग्राहकांवर पडण्याची शक्‍यता आहे.

महावितरणने खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या विजेचा दर साधारणतः प्रतियुनिट ३ रुपये ५१ पैसे आहे. बाहेरून वीजखरेदी केल्यामुळे ग्राहकांच्या इंधन आकारात वाढ होईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यातील भारनियमन टाळण्यासाठी ऑनलाइन करार करून विविध खासगी कंपन्यांकडून महिनाभर वीजखरेदी केली जाणार आहे. त्यामुळे दिवाळीत आणि दिवाळीनंतरही भारनियमनाची समस्या राहणार नाही. कोळशाचा पुरवठा लवकरच पूर्ववत होईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या पावसामुळे विजेच्या मागणीत घट झाली. आज राज्यात १४ हजार ७०० मेगावॉट विजेची मागणी होती आणि तेवढी वीज उपलब्ध करून देण्यात आली. सध्या महावितरणकडून ४ हजार ६०० मेगावॉट, अदानीकडून २ हजार २००, रतन इंडियाकडून ५०० मेगावॉट, केंद्रीय प्रकल्पातून ३ हजार ९००, जेएसडब्ल्यूकडून ५६० मेगावॉट, सीजीपीएलकडून ५६०, एम्कोकडून ८५, पवनऊर्जेतून २०० मेगावॉट, उरण प्रकल्पातून २७०; तर जलविद्युत प्रकल्पातून १०० मेगावॉट वीज उपलब्ध असल्याची माहिती ऊर्जामंत्र्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com