महावितरणने ग्राहकांचे 377 कोटी थकवले 

महावितरणने ग्राहकांचे 377 कोटी थकवले 

मुंबई -  महावितरणने वीज ग्राहकांकडून वसूल केलेल्या 376 कोटी 80 लाख रकमेचा परतावा एक वर्षानंतरही दिला नसल्याची माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने दिली. परताव्याचा हा आकडा व्याजासह 700 कोटींवर पोचल्याचा संघटनेचा दावा आहे. 

जानेवारी 2005 ते एप्रिल 2007 दरम्यानच्या "सर्व्हिस लाइन चार्जेस'पोटी (एसएलसी) 178 कोटी 20 लाख, "आउटराइट कॉन्ट्रिब्युशन चार्जेस'चे (ओआरसी) 72 कोटी 89 लाख, मीटरच्या किमतीपोटी वसूल केलेली 125 कोटी 72 लाख रुपये अशी रक्कम महावितरणने वसूल केली आहे. महावितरणने ही रक्कम ग्राहकांना परताव्याच्या रूपात देणे अपेक्षित आहे, असे ग्राहक संघटनेचे म्हणणे आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने अपील फेटाळल्यास वर्ष होऊनही परतावा देण्याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले. या आदेशाची अंमलबजावणी होत नाही, तोवर महावितरणच्या सर्व याचिका आयोगाने तहकूब कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

विजेचे खांब, वीजवितरण वाहिन्यांवर 20 जानेवारी 2005 पासून आतापर्यंत खर्च केलेल्या सर्व रकमा परताव्यास पात्र आहेत. त्या व्याजासह परत कराव्यात, असा आदेश आयोगाने दिला आहे. तसेच "एसएलसी' आणि "ओआरसी'च्या स्वरूपात वसूल केलेली रक्कमही महावितरणने परत करावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. महावितरणने आतापर्यंत केवळ 26 कोटी रुपयांचा परतावा ग्राहकांना दिला आहे. कंपनीची कोणतीही नवीन याचिका आयोगाने दाखल करून घेऊ नये, असे संघटनेचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com