सातवा वेतन आयोगच हवा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

मुंबई - सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने नवीन वेतन करार न केल्याने एसटी महामंडळाने थेट कर्मचाऱ्यांशी संवाद सुरू केला आहे. या संवादात आतापर्यंत बहुतांश एसटी कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोगच लागू करा, अशी भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नवा वेतन करार करण्याविषयी कर्मचाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी एसटी महामंडळाने बुधवार ते शुक्रवारी राज्यभरातील आगारांमध्ये संवाद बैठका घेतल्या. राज्य परिवहन कामगार करार 2012 ते 2016 ची मुदत संपली आहे. नवीन कामगार करारासाठी समिती गठित करण्यात आली आहे. हा करार 30 एप्रिल 2017 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. वेतनश्रेणी सुधारण्याबाबत ठोस प्रस्ताव देण्याचेही सूचित करण्यात आले होते. मात्र या प्रस्तावाअभावी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देता येत नसल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या या संवाद बैठकांमध्ये बहुतांश कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्य व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्यामुळे आयोगाच्या बाजूनेच कौल दिल्याचे सांगण्यात आले. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबईसह अनेक विभागांत कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला.

Web Title: maharashtra news MSRTC

टॅग्स