वेतनातून तोटा वसुलीस एसटी अधिकाऱ्यांचा विरोध 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

मुंबई - शटल आणि विनावाहक सेवेतील फेऱ्यांच्या सरासरी तोट्यासाठी एसटी महामंडळाने तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतनातून तोट्यांची रक्कम वसूल करण्याचे परिपत्रक काढले आहे. त्याला अधिकारी वर्गातून विरोध होऊ लागला आहे. महाव्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या वेतनातूनही फेऱ्यांच्या तोट्यांची रक्कम वसूल करा, अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे. अधिकारी आक्रमक झाल्याने महामंडळाची तातडीची बैठक आठवडाभरात बोलावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

एसटी महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने ग्रामीण आणि शहरी भागांत विनावाहक आणि शटल सेवा सुरू केली आहे. त्यानंतरही महामंडळाला तोटाच सहन करावा लागत आहे. प्रत्येक आगाराला फेऱ्यांमागे अंतर आणि उत्पन्नाचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे; मात्र उद्दिष्ट न गाठल्यास आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी आणि विभागीय नियंत्रकांना जबाबदार धरण्यात येणार आहे. तोट्याची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे. त्यानुसार आगार व्यवस्थापकाकडून 50 टक्के, विभागीय वाहतूक अधिकाऱ्याकडून 30 टक्के आणि विभाग नियंत्रकाच्या वेतनातून 20 टक्के रक्कम वसूल करण्याबाबतचे परिपत्रक प्रशासनाने नुकतेच काढले आहे. 

Web Title: maharashtra news MSRTC ST bus