बुलेट ट्रेन ठरणार महाराष्ट्राला महाग 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

मुंबई - मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन महाराष्ट्रासाठी महागडी ठरणार आहे. मुंबईतील अवघ्या 120 किलोमीटरच्या मार्गासाठी राज्य सरकारला 27 हजार कोटी खर्च करावे लागणार आहेत. तर गुजरात सरकार 388 किलोमीटरच्या मार्गावर इतकाच खर्च करणार आहे. 

मुंबई - मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन महाराष्ट्रासाठी महागडी ठरणार आहे. मुंबईतील अवघ्या 120 किलोमीटरच्या मार्गासाठी राज्य सरकारला 27 हजार कोटी खर्च करावे लागणार आहेत. तर गुजरात सरकार 388 किलोमीटरच्या मार्गावर इतकाच खर्च करणार आहे. 

बुलेट ट्रेनवरून शिवसेनेसह सर्वच विरोधकांनी भाजपला लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. त्यातच आता बुलेट ट्रेनच्या खर्चाचा मुद्दा चर्चेत आला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी "घाट्याचा सौदा' ठरणार आहे. बुलेट ट्रेनचा निम्मा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. गुजरात आणि महाराष्ट्राचा यात प्रत्येकी 25 टक्के वाटा असणार आहे. महाराष्ट्रातून अवघा 120 किलोमीटरचा मार्ग आहे. अर्थात, प्रत्येक किलोमीटरसाठी राज्य सरकार 225 कोटी खर्च करणार आहे. गुजरात सरकार मात्र किलोमीटरसाठी 69 कोटी 58 लाख खर्च करणार आहे. गुजरातमधून बुलेट ट्रेनचा 388 किलोमीटरचा मार्ग आहे. तरीही केंद्र सरकारच्या निर्णयानुसार दोन्ही राज्यांना समान आर्थिक भार उचलावा लागणार असल्याने महाराष्ट्रासाठी बुलेट ट्रेन महागडी ठरणार, असे बोलले जात आहे. 

125 कोटींचा पहिला हप्ता 
या प्रकल्पासाठी "स्पेशल पर्पज व्हेईकल' हे प्राधिकरण तयार करण्यात येणार आहे. त्याचे 20 हजार कोटी भाग भांडवल आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा पाच हजार कोटी असेल. त्यातील 125 कोटींचा पहिला हप्ता राज्य सरकार केंद्राला देणार आहे. 

महाराष्ट्रात... 
- मार्ग - 120 किलोमीटर 
- स्थानके - मुंबई, ठाणे, विरार, बोईसर 

गुजरातमध्ये... 
- मार्ग - 388 किलोमीटर 
- स्थानके - वापी, बिलिमोर, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, साबरमती 
- बडोदा येथे प्रशिक्षण केंद्र 

दिवसेंदिवस रेल्वे अपघात वाढ होत आहे. योग्य सुविधांअभावी गोरखपूर आणि नाशिकमध्ये मुलांचे मृत्यू होत आहेत. अशा प्राथमिक समस्या असताना बुलेट ट्रेनसारखा आयकॉनिक प्रकल्प हवाच कशाला? पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी अधिक खर्च करण्याची गरज आहे. मात्र, या खर्चाला कात्री लावून बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांवर अनावश्‍यक खर्च केला जात आहे. 
- अशोक दातार, वाहतूक तज्ज्ञ 

Web Title: maharashtra news mumbai bullet train