‘आयएएस’ दांपत्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

मुंबई - ज्येष्ठ सनदी अधिकारी मनीषा व मिलिंद म्हैसकर यांचा मुलगा मन्मथ (वय १८) याचा मृतदेह आज सकाळी नेपियन सी रस्त्यावरील दर्यामहल इमारतीखाली सापडला. याप्रकरणी मलबारहिल पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली. मन्मथने आत्महत्या केल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

मन्मथ हा म्हैसकर दांपत्याचा एकुलता एक मुलगा होता. तो मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास अगरवाल नावाच्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता. त्यानंतर नेपियन सी रस्त्यावर असलेल्या दर्या महल इमारतीखाली त्याचा मृतदेह सापडला. नियंत्रण कक्षाकडून दर्यामहल इमारतीवरून एक युवक खाली पडल्याचा दूरध्वनी मलबारहिल पोलिसांना मिळाली. जे. जे. रुग्णालयात शवविच्छेद केल्यानंतर मन्मथचा मृतदेह कुटुंबीयांकडे देण्यात आला. न्यायवैधक प्रयोग शाळेकडून व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिस सध्या मन्मथच्या मित्रांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत असून, त्यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. मन्मथची आई मनीषा म्हैसकर या नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत, तर वडील मिलिंद म्हैसकर म्हाडाचे उपाध्यक्ष, सीईओ आहेत. 

कोण आहे अगरवाल?
मन्मथ हा अगरवाल नावाच्या मित्राला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगून निघाला; पण दर्यामहल इमारतीत अगरवाल नावाचा कोणीच राहत नसल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

Web Title: maharashtra news mumbai suicide