निकाल दिरंगाईवर पुन्हा चर्चा होणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या निकाल दिरंगाईचे पडसाद गुरुवारी विधान परिषदेत पुन्हा उमटले. गुणपत्रिका वेळेत मिळत नसल्याने लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या विषयावर पुन्हा एकदा चर्चा घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. ती सभापतींनी मान्य केली. 

परदेशी शिकायला निघालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे आणि प्राध्यापक नसलेल्या लोकांमार्फत उत्तरपत्रिका तपासल्या जात असल्याची चर्चा सुरू आहे, असे निदर्शनास आणत मुंडे यांनी या विषयावर चर्चेची मागणी केली. त्यांना कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांनी पाठिंबा देत हा विषय तातडीने चर्चेला घेण्याची मागणी सभापतींकडे केली. या विषयाची गंभीर दखल घेत सभापतींनी सविस्तर चर्चा घेण्याचे, तसेच शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत आपल्या दालनात दोन दिवसांत बैठक बोलावण्याचे निर्देश दिले.

Web Title: maharashtra news mumbai university Dhananjay Munde