महापालिकांच्या पोटनिवडणुकीची प्रारूप मतदार यादी 19 ऑगस्टला 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई  - नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक आणि मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर या महापालिकांच्या पोटनिवडणुसाठीची प्रारूप मतदार यादी 19 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी मंगळवारी (ता. 25) येथे दिली. 

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग 116, नागपूर महापालिका प्रभाग 35अ, कोल्हापूर महापालिका प्रभाग 11 व 77 आणि पुणे महापालिका प्रभाग 21अ व 39अ या जागा रिक्त आहेत. या सहापैकी तीन जागा सदस्यांच्या निधनामुळे; तर तीन जागा संबंधित सदस्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने रिक्त झाल्या आहेत, असेही सहारिया यांनी सांगितले. 

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची मुदत 30 ऑक्‍टोबर 2017 रोजी संपत असल्याने निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. तिचे प्रभागनिहाय विभाजन करून 19 ऑगस्ट 2017 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून 28 ऑगस्ट 2017 पर्यंत या याद्यांवर हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार याद्या 7 सप्टेंबर 2017 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्याच दिवशी मतदान केंद्रांची यादी; तसेच प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्याही प्रसिद्ध केल्या जातील, असेही सहारिया यांनी स्पष्ट केले. 

मतदान केंद्रांवर सुविधा 
मतदान केंद्रे तळमजल्यावर असावीत. अपवादात्मक स्थितीत पहिल्या मजल्यावर असल्यास लिफ्ट किंवा डोलीची व्यवस्था करावी. वीज, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, सावली, दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर आदी सोईसुविधा देण्यात आल्याची माहितीही सहारिया यांनी सांगितले. 

Web Title: maharashtra news municipal corporation By-election