गोळीबाराच्या गुन्ह्यातील आरोपींना पाच दिवस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

कर्जत, (जि. नगर) - पोलिसांवर गोळीबार केल्याच्या गुन्ह्यात काल (गुरुवारी) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी दिला. पोलिस निरीक्षक वसंत भोये यांनी ही माहिती दिली. रेवणनाथ प्रभाकर जाधव (वय 24, रा. वीट, ता. करमाळा, जि. सोलापूर) व पदमराज अर्जुन डोणे (वय 22, रा. मिरजगाव) अशी आरोपींची नावे आहेत. नगर-सोलापूर रस्त्यावर 17 जुलै रोजी रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांवर गोळीबार करून आरोपी पळून गेले होते. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने तालुक्‍यातील रवळगाव शिवारात काल दोघांना पकडले.

कर्जत, (जि. नगर) - पोलिसांवर गोळीबार केल्याच्या गुन्ह्यात काल (गुरुवारी) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी दिला. पोलिस निरीक्षक वसंत भोये यांनी ही माहिती दिली. रेवणनाथ प्रभाकर जाधव (वय 24, रा. वीट, ता. करमाळा, जि. सोलापूर) व पदमराज अर्जुन डोणे (वय 22, रा. मिरजगाव) अशी आरोपींची नावे आहेत. नगर-सोलापूर रस्त्यावर 17 जुलै रोजी रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांवर गोळीबार करून आरोपी पळून गेले होते. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने तालुक्‍यातील रवळगाव शिवारात काल दोघांना पकडले. त्यांना आज सकाळी येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. 

Web Title: maharashtra news nagar news Firing case