राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत चंद्रकांत पाटलांचे कानावर हात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

पुणे - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाबाबत पक्षाच्या कोअर कमिटीत कोणतीच चर्चा झालेली नाही, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे स्पष्ट केले. राणे पक्षात आल्यास त्यांच्यासाठी आपण मंत्रिपद सोडू, या माझ्या वक्‍तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

पाटील यांच्या आजच्या स्पष्टोक्तीने राणे यांच्या भाजप प्रवेशाला सध्या तरी पूर्णविराम मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. कॉंग्रेसला सोडल्यानंतर राणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार, अशी चर्चा गेली काही महिने सुरू होती. मात्र, राणे आमच्या कोणत्याच नेत्याच्या संपर्कात नव्हते. त्यांच्या प्रवेशाबाबत कोअर कमिटीत कोणतीच चर्चा झालेली नाही, असे सांगून पाटील यांनी राणे यांच्याबाबत हात झटकले आहेत. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह राणे हे अहमदाबाद येथे अमित शहा यांच्या भेटीला गेल्यापासून त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. त्यासाठी वेगवेगळे मुहूर्तदेखील सांगण्यात येत होते. मात्र, घटस्थापनेच्या मुहूर्तावर राणे यांनी केवळ कॉंग्रेसचा राजीनामा देत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह साऱ्यांनाच लक्ष्य केले होते. या पार्श्‍वभूमीवर पाटील यांनी पक्षाची स्पष्ट केलेली भूमिका राजकारणाला वेगळी दिशा देणारी आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 15 ऑक्‍टोबरपर्यंत पैसे जमा होतील. यंदा उसाची किमान आधारभूत किंमत (एफआरपी) जास्त असल्याने कारखान्यांकडून टनाला किमान तीन हजार रुपये दर अपेक्षित असल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

Web Title: maharashtra news narayan rane chandrakant patil