शिवसेनेच्या मेंदूचा झोल झोल म्हणून त्यांची भूमिका गोल गोल 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 जुलै 2017

मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठक आणि स्वतंत्र पत्रकार परिषदेत आरजे मलिश्‍का फीव्हर दिसून आला. 

मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठक आणि स्वतंत्र पत्रकार परिषदेत आरजे मलिश्‍का फीव्हर दिसून आला. 

मुंबईतील खड्ड्यांच्या विषयावर आरजे मलिश्‍का हिने रचलेल्या "सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का' ही धून असलेले गाणे चांगलेच गाजले. त्याचा विरोधी पक्षनेत्यांवरही चांगलाच प्रभाव पडल्याचे दिसून आले. दोन्ही कॉंग्रेसमध्ये फूट पडली असतानाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खास शैलीत या गाण्याचा उल्लेख केला. दोन्ही पक्षांतील फुटीच्या पार्श्वभूमीवर "राष्ट्रवादीचा आमच्यावर भरवसा नाय काय', असा मिस्कील सवाल विखे-पाटील यांनी केला. शिवसेनेची अवस्था एफएम रेडिओनी उघड केली. "शिवसेनेचा मेंदू झोल झोल, म्हणून त्यांची भूमिका गोल गोल, विरोधी पक्षात मात्र कोणताही झोल नाही', अशी टिप्पणी विखे-पाटील यांनी केली. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, "कुणाचा कुणावर भरोसा नाय ते विखेच ओळखून आहेत.' 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. "तीन वर्षांत सरकारचा कारभार गोल गोल, कारभारामागे झोल झोल, मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री सोनू, म्हणून सरकारवर भरोसा राहिला नाय', अशी टिप्पणी मुंडे यांनी केली. 

Web Title: maharashtra news NCP Congress