अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे संकेतस्थळ आज बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

मुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठीचे संकेतस्थळ सतत "हॅंग' होत असल्याने हे संकेतस्थळ उद्या (ता. 21) एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

मुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठीचे संकेतस्थळ सतत "हॅंग' होत असल्याने हे संकेतस्थळ उद्या (ता. 21) एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश देण्यासाठी संकेतस्थळ सुरू केले आहे. पार्ट 1 व पार्ट 2 या पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. हे संकतेस्थळ सतत "हॅंग' होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांनी केल्या आहेत. अर्ज भरताना असंख्य अडचणी येत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संकेतस्थळ अपडेट करण्यासाठी एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे, असे विनोद तावडे यांनी जाहीर केले. 

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या संकेतस्थळाची तपासणी होईल. गुरुवारी सकाळी 10 वाजता संकेतस्थळ ऑनलाईन प्रवेशासाठी सुरळीतपणे सुरु होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. मुंबईवगळता अन्य केंद्रावर मात्र अकरावी ऑनलाइन प्रक्रिया सुरू राहील.

Web Title: maharashtra news online admission