बीजी 3 कापूस बियाण्यांच्या विक्रीवर निर्बंध - कृषिमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

मुंबई - तृणनाशक जिनचा (हर्बिसाइड टोलरंट) समावेश असलेल्या बिजी 3 नावाने वेगवेगळ्या कंपन्या कापूस बियाण्यांची विक्री राज्यात विनापरवाना करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर प्रतिबंध करण्यासाठी राज्यातील बायोटेक्‍नॉलॉजिस्ट समन्वय समितीची बैठक घेण्याचे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिले. 

देशात बिजी 1 आणि बिजी 2 या प्रमाणित बियाण्यांच्या विक्रीसाठी केंद्र शासनाने परवानगी दिलेली आहे. मात्र, काही कंपन्या वेगवेगळे ब्रॅंडनेम वापरून तृणनाशक गुणधर्म असलेले बिजी 3 कापसाचे बियाणे परवाना नसताना विक्री करीत आहेत. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगण यांसारख्या कापूस उत्पादक राज्यांत अशाप्रकारची विक्री होत आहे. केंद्रीय कापूस संशोधन केंद्राने काही नमुने तपासल्यावर ते पॉझिटिव्ह आढळून आले आहे. याबाबतची माहिती घेऊन अशा विनापरवाना बियाणे विक्रीवर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी बैठक घ्यावी. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्यस्तरीय बायोटेक्‍नॉलॉजी समन्वय समितीची बैठक आयोजित करावी, असे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले. या हर्बीसाइड टोलरंट बियाण्यांचे सामाजिक, शारीरिक व कृषी क्षेत्रावर होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास न करता विक्री होत आहे, ही गंभीर बाब असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. 

Web Title: maharashtra news pandhurang phundkar cotton