17 नगरपालिका, नगरपंचायतींसाठी 10 व 13 डिसेंबरला मतदान 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

मुंबई - राज्यातील विविध 17 नगरपालिका, नगरपंचायतींचे सदस्य व अध्यक्षपदाच्या निवडणुकांसाठी; तसेच जेजुरी नगरपालिकेचे अध्यक्ष व इतर विविध ठिकाणच्या 10 सदस्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी दोन टप्प्यांत 10 व 13 डिसेंबरला मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली. 

सहारिया यांनी सांगितले की, सर्व संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबक नगरपालिकेचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी 16 ते 22 नोव्हेंबरपर्यंत असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 नोव्हेंबरला होईल. न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 28 नोव्हेंबरला; तर अपील असलेल्या ठिकाणी अपिलाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 10 डिसेंबरला मतदान होईल. 11 डिसेंबरला मतमोजणी होईल. 

डहाणू, जव्हार, हुपरी, जत, नंदुरबार, नवापूर, तळोदा, किनवट, चिखलदरा, पांढरकवडा व आमगांव या 11 नगरपालिकांचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी; तसेच वाडा, फुलंब्री, सिंदखेडा व सालेकसा या चार नगरपंचायतींचे सदस्य आणि अध्यक्षपदांसाठी 13 डिसेंबरला मतदान होईल. नामनिर्देशनपत्रे 18 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत स्वीकारली जातील. 25 नोव्हेंबरला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान 13 डिसेंबरला होईल. मतमोजणी 14 डिसेंबरला होईल. 

Web Title: maharashtra news Polling for the municipal corporation, Nagar Panchayats