प्रदूषित शहरांच्या यादीत राज्यातील 17 शहरे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई - केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या देशभरातील प्रदूषित शहरांच्या यादीत राज्यातील 17 शहरांचा समावेश आहे. या शहरांतील प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे, असे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी मंगळवारी (ता. 22) केले. 

पर्यावरण विभागाच्या एकदिवसीय "शुद्ध हवा संकल्प महाराष्ट्र' या विषयावरील राष्ट्रीय परिषेदेच्या उद्‌घाटनप्रसंगी पोटे बोलत होते. ते म्हणाले, ""देशात 123 शहरे प्रदूषित आहेत. त्यात महाराष्ट्रातील 17 शहरांचा समावेश आहे. प्रदूषणमुक्तीसाठी सरकार विविध उपाययोजना करीत असले, तरी प्रत्येकाने स्वच्छतेची सुरवात आपल्या घरापासून करावी. प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. महानगरपालिकेने 25 टक्के निधी प्रदूषणाव्यतिरिक्त महत्त्वाच्या कामासाठी खर्च केला पाहिजे.'' 

निकृष्ट हवेची 17 शहरे 
हवेच्या गुणवत्तेची पातळी निर्धारित मानकापेक्षा अधिक असलेली शहरे : अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर आणि उल्हासनगर.

Web Title: maharashtra news polluted city