राज्यात यंत्रमाग उद्योगाला बुस्ट! 

सिद्धेश्‍वर डुकरे
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

मुंबई - राज्यातील वस्त्रोद्योगाला चालना मिळणार असून, या उद्योगासाठी बुस्टर देणारा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार आहे. वस्त्रोद्योगामध्ये पॉवरलूम, रॅरियर लूमचा एक शेड उभा करून 16 ते 24 युनिटपर्यंत स्थापित केला जातो. या युनिटसाठी सरसकट 200 हॉर्सपॉवर वीज देण्याचा निर्णय सरकार घेणार असून, यासंबंधी लवकरच सरकार आदेश निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

यंत्रमाग उद्योग उभारण्यासाठी विजेची गरज लक्षात घेऊन सध्या 105 हॉर्सपॉवरइतकी वीज एक लूम युनिटमागे दिली जाते; मात्र एका शेडला एवढी वीज पुरेशी ठरत नाही. यामुळे दोन 105 एचपीचे वीज युनिट लावावे लागतात; मात्र आता एकाच शेडमध्ये राज्यातील सर्व यंत्रमाग उद्योगाला 200 एचपी वीज देण्याचा निर्णय शासन घेणार असल्याचे समजते. या निर्णयामुळे यंत्रमागधारकांची शासन, बॅंक व सनदी लेखापाल यांच्या अनुत्पादिक खर्चातून मुक्तता होणार आहे. 

सध्या एका शेडसाठी 200 एचपीची परवानगी केवळ महानगर क्षेत्रात आहे; मात्र नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात यासाठी परवानगी नव्हती. त्यामुळे यंत्रमागचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता; मात्र आता ही परवानगी सर्व ठिकाणच्या उद्योगाला मिळणार आहे. याचा पाठपुरावा आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला होता. हळवणकर यांची एक समिती नेमली होती. याची दखल घेत ऊर्जा विभागाने आता 200 एचपी वीज यंत्रमाग उद्योगासाठी देण्याचे ठरविले आहे. तसेच 105 एचपीच्या युनिटसाठी बॅंकांमध्ये लोनच्या दोन फाइल्स कराव्या लागायच्या त्या टळणार आहेत. 

""या संदर्भात माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. 200 एचपीच्या एका युनिटसाठी परवानगी देण्यात आल्याचे खरे आहे. यासंदर्भात आठवड्याभरात शासन निर्णय निघणार आहे.'' 
सुरेश हाळवणकर, आमदार 

Web Title: maharashtra news Powerloom Industry