पंतप्रधान आवासमध्ये महाराष्ट्र अग्रेसर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

मुंबई - केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट नियोजन करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी दारिद्य्रनिर्मूलन आणि नगरविकास विभागातर्फे उद्या (ता. 23) हा पुरस्कार दिला जाणार आहे. 

प्रधानमंत्री आवास योजना-सर्वांसाठी घरे (नागरी) या योजनेच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त गृहनिर्माण व शहरी दारिद्य्रनिर्मूलन आणि नगरविकास विभागाच्या वतीने "नागरी स्थित्यंतरे' या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत महाराष्ट्राची निवड करण्यात आली. राज्य सरकारच्या वतीने हा पुरस्कार महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष आणि राज्य अभियान संचालनालयाचे संचालक मिलिंद म्हैसकर स्वीकारणार आहेत. 

Web Title: maharashtra news Prime Minister's house Maharashtra leads