महेतांचा राजीनामा घ्या - पृथ्वीराज चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

मुंबई - ताडदेव येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी मारलेल्या शेऱ्यामुळे सरकारचे 500ते 700 कोटी रुपयांचे नुकसान झाले. यासंदर्भात माध्यमात वृत्त आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब तो निर्णय रद्द केला. यावरून वादळ उठले असून, याचा उलगडा होईपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महेता यांचा राजीनामा घ्यावा आणि पुढील चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधनसभेत केली. विरोधी सदस्यांनी नियम 293 अन्वये मुंबईसह राज्यतील महापालिका, नगरपालिका व नगरपंचायती यांची डबघाईला आलेली आर्थिक स्थिती आदी प्रश्‍नांवर चर्चा उपस्थित केली होती.

मुंबई - ताडदेव येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी मारलेल्या शेऱ्यामुळे सरकारचे 500ते 700 कोटी रुपयांचे नुकसान झाले. यासंदर्भात माध्यमात वृत्त आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब तो निर्णय रद्द केला. यावरून वादळ उठले असून, याचा उलगडा होईपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महेता यांचा राजीनामा घ्यावा आणि पुढील चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधनसभेत केली. विरोधी सदस्यांनी नियम 293 अन्वये मुंबईसह राज्यतील महापालिका, नगरपालिका व नगरपंचायती यांची डबघाईला आलेली आर्थिक स्थिती आदी प्रश्‍नांवर चर्चा उपस्थित केली होती. याची सुरवात चव्हाण यांनी केली. चर्चेत पृथ्वीराज चव्हाण यांनी नगरविकास विभागाच्या योजना राबवताना या सरकारने कसा गोंधळ वाढवला आहे, हे सांगितले. 

शोक प्रस्ताव आणावा लागला असता 

आमदार निवासांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मनोरा निवासात कधीही काही होते. भास्कर जाधव यांच्या खोलीचे छत पडले. ते बाहेर होते त्यामुळे अनर्थ टळला. नाही तर त्यांचा शोक प्रस्ताव दाखल करावा लागला असता, असे शिवसेनेचे आमदार संतोष सबणे यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. साबणे यांनी आमदार निवासाच्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. 

Web Title: maharashtra news Prithviraj Chavan Prakash Mehta