मोपलवार यांच्या चौकशी समितीला दोन महिन्यांची मुदत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मुंबई - राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांच्यावर झालेल्या आरोपांची करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली असून, अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच या समितीच्या स्थापनेचे आदेश लवकरच जारी होण्याची शक्‍यता आहे. 

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मोपलवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. तसेच या संदर्भातील मोपलवार यांच्या फोनवरील संभाषणाच्या सीडी विरोधी पक्षांनी विधिमंडळात सादर केल्या होत्या. मोपलवार यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या चौकशीसाठी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. समितीत दोन आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. अर्थिक गुन्हे शाखा आणि गुन्हे विभागातील हे दोन अधिकारी असतील. चौकशी समितीने दोन महिन्यांत राज्य सरकारला अहवाल द्यावयाचा आहे. 

सेवानिवृत्ती जवळ आल्याने चौकशीचे काय होणार 
दरम्यान, मोपलवार यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे असून, त्यांच्या फोनवरील संभाषणाची खातरजमा फॉरेन्सिक लॅबकडून करण्यात येणार आहे. यासाठी चौकशी समितीला मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मोपलवार हे येत्या फेब्रुवारी 2018 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. चौकशी समितीचे काम किती महिन्यांत पूर्ण होणार आणि त्याचे स्वरूप काय असेल यावर मोपलवार यांच्यावरील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: maharashtra news Radheshyam Mopalwar