राज्यात पावसाचा जोर ओसरला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

पुणे  - शहरात सोमवारी सकाळी पुणेकरांनी ऊन-पावसाचा खेळ अनुभवला. दुपारनंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. कोकण आणि घाटमाथा वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर ओसरला असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने सोमवारी नोंदविले आहे. 

श्रावणाच्या पहिल्या दिवशी शहरात सकाळी पावसाच्या काही सरी पडल्या. त्यानंतर दहाच्या सुमारास कडकडीत ऊन पडले होते. दुपारी बाराच्या सुमारास पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत दोन मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून पुण्यात 382.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झालेल्या पावसाचा जोर मध्य महाराष्ट्र व घाटमाथा वगळता इतर भागात ओसरला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्‍या सरी पडत असून, कोकणातील अनेक भागात पावसाची रिमझिम सुरू आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, नगरच्या काही भागांत सकाळी पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. 

हलक्‍या पावसाची शक्‍यता 
कोकण व मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी, तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मंगळवारी (ता. 25) पाऊस पडेल. तसेच कोकण व गोव्यातील बहुतांशी ठिकाणी शुक्रवारपर्यंत (ता. 29) हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Web Title: maharashtra news rain