राज्यात पावसाचा लपंडाव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

पुणे - राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली; परंतु मागील चार ते पाच दिवसांमध्ये मराठवाड्यातील काही ठिकाणीच पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या असल्या, तरी बुधवारी मराठवाड्यातून पाऊस गायब झाल्याचे चित्र होते. पुण्यात दिवसभरातून पावसाची एखादीच हलकी सर पडली. कोकणातील काही भाग आणि घाटमाथ्यावर पावसाच्या सरींनी हजेरी लावली. 

राज्यात 13 जुलैपासून पावसाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला. कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भाग व विदर्भातील काही भागात भातलागवड वेगाने सुरू आहेत. आत्तापर्यंत कोकण वगळता, मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाने दडी मारली आहे. 

हर्णे, कर्जत, लांजा, माथेरान, पेडणे, राजापूर, वैभववाडी येथे हलक्‍या सरी बरसल्या. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर, इगतपुरी, लोणावळा, शहादा, गगनबावडा, तळोदा, वेल्हे, अक्कलकुवा, आंबेगाव, घोडेगाव, चंदगड येथेही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. विदर्भातील आष्टी, चिखलदरा, खारंगा, अकोट, चामोर्शी, चांदूरबाजार, हिंगणघाट, काटोल, कामठी, अमरावती, अर्जुनी मोरगाव येथे हलक्‍या सरी कोसळल्या. विदर्भातील अनेक भागांत ढगाळ हवामान होते. 

कोकण, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज 
कोकण, गोव्यात येत्या रविवारपर्यंत (ता. 30) बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्‍या सरी बरसण्याची शक्‍यता आहे.

Web Title: maharashtra news rain