अवकाळीचा धसका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

उंडवडी  - बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागातील कारखेल, उंडवडी सुपे, सोनवडी सुपे, खराडेवाडी, अंजनगाव, बऱ्हाणपूर, गोजुबावी, उंडवडी कडेपठार, सोनवडी सुपे, जळगाव सुपे आदी भागात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, मका, कांदा आदी पिके घेतली आहेत. या पिकांना शेतकऱ्यांनी पाणी देऊन भिजवल्यामुळे पिके बहरात आली आहेत; मात्र या भागात गेल्या दोन दिवसांपासून सकाळपासूनच ढगाळ वातावरण व थंड वारा सुटत असल्याने पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहेत.

उंडवडी  - बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागातील कारखेल, उंडवडी सुपे, सोनवडी सुपे, खराडेवाडी, अंजनगाव, बऱ्हाणपूर, गोजुबावी, उंडवडी कडेपठार, सोनवडी सुपे, जळगाव सुपे आदी भागात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, मका, कांदा आदी पिके घेतली आहेत. या पिकांना शेतकऱ्यांनी पाणी देऊन भिजवल्यामुळे पिके बहरात आली आहेत; मात्र या भागात गेल्या दोन दिवसांपासून सकाळपासूनच ढगाळ वातावरण व थंड वारा सुटत असल्याने पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहेत. सलग तीन वर्षे दुष्काळाशी संघर्ष केल्यानंतर या वर्षी चांगला पाऊस झाल्याने ओढे, नाले आणि विहिरीच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी पिके भिजवून काढली आहेत; मात्र वारा सुटत असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांची भिजवलेली पिके खाली लोळली आहेत. त्यामुळे ज्वारीचे नुकसान झाले आहे.

जुन्नरला हलक्‍या सरी  
जुन्नर ः जुन्नर तालुक्‍यात मंगळवारी सर्वत्र ढगाळ हवामान होते. अधून-मधून पावसाच्या हलक्‍या सरी कोसळत होत्या. हवेत गारवा वाढला. रब्बी हंगामातील पिकांवर रोगकिडीचा प्रार्दुभाव झाला आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा व कांदा पिकावर मावा तुडतुड्याचा; तर कोबी, फ्लॉवर या पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तो रोखण्यासाठी शेतकऱ्यांना औषध फवारणीच्या खर्चाला सामोरे जावे लागत आहे. 

वडापुरीत ढगाळ वातावरण
वडापुरी : ‘ओखी’ चक्रीवादळामुळे ग्रामीण भागात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. वडापुरी परिसरात दिवसभर हवेत गारवा आणि वातावरण ढगाळ होते. या वातावरणामुळे शेतकरी धास्तावले आहेत. वडापुरी परिसरात नुकतीच थंडी जाणवू लागली होती. त्यामुळे सर्दी, ताप, खोकलासारखे आजार वाढले असून, रुग्णांची संख्या वाढली होती.

माळशेजची वाहतूक ठप्प
जोराच्या वाऱ्यामुळे कल्याण- नगर मार्गावरील माळशेज घाटाच्या अलीकडे निरगुडी फाटा येथे आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळले.

Web Title: maharashtra news rain