मराठवाडा, मध्य महाराष्ट्राने सरासरी ओलांडली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

पुणे - यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या महिन्याभरात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आतापर्यंत पावसाने सरासरी ओलांडली असून, मराठवाडा आणि विदर्भात सरासरी इतक्‍या पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी देण्यात आली. 

देशात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) एक दिवस आधीच म्हणजेच 30 मे रोजी दाखल झाला. तेव्हापासून त्याच्या प्रवासाचा वेग मंदावला. महाराष्ट्रात 

पुणे - यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या महिन्याभरात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आतापर्यंत पावसाने सरासरी ओलांडली असून, मराठवाडा आणि विदर्भात सरासरी इतक्‍या पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी देण्यात आली. 

देशात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) एक दिवस आधीच म्हणजेच 30 मे रोजी दाखल झाला. तेव्हापासून त्याच्या प्रवासाचा वेग मंदावला. महाराष्ट्रात 

साधारणपणे 5 जूनला दाखल होणारा मॉन्सून यंदा 8 जून रोजी पोचला. त्यानंतरही त्याच्या पुढील प्रवासाला पोषक वातावरण नसल्याने मध्य महाराष्ट्रातच त्याने विश्रांती घेतली होती. या पार्श्‍वभूमीवर मॉन्सूनच्या पावसाची माहिती हवामान खात्याने आज प्रसिद्ध केली. त्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस झाल्याचे नमूद केले आहे. 

मॉन्सून राज्यात दाखल झाल्यानंतर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. मात्र, ते वारे ओमानच्या दिशेने वाहत असल्याने अरबी समुद्रातील बाष्प त्याबरोबर वाहत गेले. त्यामुळे मध्य महाराष्ट्रापर्यंत पोचलेल्या मॉन्सूनला पुढे जाण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले नाही. या दरम्यान, राज्याच्या वेगवेगळ्या भागात वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. स्थानिक वातावरण आणि अरबी समुद्रातून आलेले बाष्प यामुळे मराठवाड्यातील दुष्काळी भागात जोरदार पाऊस पडला. तसेच, मध्य महाराष्ट्रातही काही भागात पावसाच्या दमदार सरी पडल्या. त्यामुळे या भागात 1 ते 28 जून या दरम्यान पावसाने सरासरी ओलांडली असल्याची माहिती हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. 

विदर्भात मॉन्सून उशिरा पोचला. त्यामुळे तेथे पावसाला गेल्या काही दिवसांपासून सुरवात झाली आहे. त्यामुळे तेथे सरासरी इतक्‍या पावसाची नोंद झाली. तर कोकणात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस नोंदविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

आठ विभागांनी ओलांडली सरासरी 
देशात 36 हवामान विभाग आहेत. एकसमान हवामान या आधारावर हे विभाग तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी आठ विभागांत पावसाने सरासरी ओलांडली असून, 15 विभागांमध्ये सरासरी गाठली आहे. पाच विभागांत अतिवृष्टी झाली, तर आठ विभागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे खात्यातर्फे सांगण्यात आले. त्यात सौराष्ट्र, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशचा समावेश आहे. 

Web Title: maharashtra news rain weather