राज्यात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पुणे - मध्यपूर्व व लगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भापर्यंत असलेली द्रोणीय स्थिती विरून गेली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होऊन, येत्या सोमवारपर्यंत (ता. 16) संपूर्ण राज्यातील हवामान कोरडे होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शुक्रवारी (ता. 13) कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यताही व्यक्त केली आहे. 

राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर मोठा होता. कोकणासह गोव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. पुण्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली. मात्र, दुपारी पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. एक ऑक्‍टोबरपासून आतापर्यंत शहरात 32.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुणे शहरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. 

Web Title: maharashtra news rain weather