राज्यात पावसाचा जोर ओसरला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून बहुतांशी ठिकाणी मेघगर्जनेसह पडणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली आहे. खानदेश आणि विदर्भातील काही भागातून परतल्याने परतीच्या पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे सोमवारी उकाडा वाढला होता. परिणामी, तापमान पुन्हा वाढायला सुरवात झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पुण्यात यंदा अभ्यंगस्नानाच्या वेळी ढगाळ वातावरणात असेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

राज्यातील काही काही भागात सध्या हवेचा दाब वाढत असल्यामुळे कमाल तापमानात वाढू लागले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील पश्‍चिम भागात सकाळपासून ऊन व सावलीचा खेळ सुरू होता. त्यामुळे हवामानात सकाळपासून चांगलाच उकाडा जाणवत होता. परिणामी, कमाल तापमानातही वाढ झाली. मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात कडक ऊन पडले होते. काही ठिकाणी अधूनमधून ढगाळ हवामान होत होते. त्यामुळे या भागातही उकाडा जाणवत होता. राज्यातील बहुतांशी भागातील कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली. 

महाराष्ट्रातून परतीचा पाऊस पुढे गेल्याने काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाच्या सरी पडल्या. 

हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता 
मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. 17) आणि बुधवारी (ता. 18) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. हवामानात उकाडा वाढून पुन्हा ऑक्‍टोबर हीट वाढण्याचा अंदाज आहे. गुरुवारी व शुक्रवारी गोव्यासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी बरसण्याची शक्‍यता आहे. पुणे परिसरातही आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

Web Title: maharashtra news rain weather