सुरक्षेसाठी आमदारांनी सहकार्य करावे - रामराजे 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई -  विधानभवन आणि मंत्रालय हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असून, राज्याच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. आमदारांनी तपासणीसाठी सुरक्षारक्षकांना सहकार्य न केल्यास कडक भूमिका घेण्याची वेळ येईल, असा इशारा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी दिला. 

दरम्यान, विधानभवनाच्या सुरक्षेबाबत सभापतींच्या दालनात गटनेत्यांची बैठक पार पडली. या वेळीदेखील विधानभवनाच्या काळात मंत्री आणि आमदारांना भेटायला येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आपल्याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच विधानभवनाच्या प्रवेश गॅलरीमध्ये अनेक आमदारांच्या खासगी सचिवांचा राबता असतो. तोही बंद करता येईल का यावरदेखील चर्चा झाली. 

सभागृहाचे कामकाज आज सकाळी सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानभवन आणि मंत्रालय दहशतवाद्यांचे लक्ष्य असून, सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने कठोर भूमिका घ्यावी लागेल, असे सांगितले. आमदारांनी यासाठी सहकार्य करावे, तपासणी करू द्यावी तसेच सभागृहातली, लॉबीतली गर्दी टाळावी, अशा सूचना सभापतींनी या वेळी केल्या. आमदारांच्या खासगी सचिवांच्या गळ्यात ओळखपत्र नसते याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: maharashtra news ramraje naik nimbalkar