रिमोट कंट्रोलच्या विमानांवर निर्बंध 

रिमोट कंट्रोलच्या विमानांवर निर्बंध 

मुंबई - खेळांसाठी किंवा स्पर्धांसाठी वापरल्या जाणाऱ्या रिमोट कंट्रोलच्या छोट्या विमानांचा "ड्रोन'चा श्रेणीत समावेश करूनही कठोर नियंत्रणे आणल्याने हौशी एरो मॉडेलरनी नाराजी व्यक्त केली. नव्या नियमांनुसार या विमानांचीही नोंदणी करावी लागेल आणि ती चालविणारी व्यक्ती सज्ञान असावी, अशी अट आहे. 

"डीजीसीए'ने यासंदर्भात नुकतीच नियमावली जारी केली. देशात 32 हजारांहून जास्त हौशी एरो मॉडेलर आहेत. ते शिक्षण, मनोरंजन व क्रीडाप्रकार म्हणून रिमोट कंट्रोलवरील मिनिएचर विमाने, हेलिकॉप्टर, ग्लायडर चालवतात. मात्र, या विमानांचा आता "यूएव्ही' म्हणजेच मानवरहित विमानांच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या विमानांवर निर्बंध येतील. "डीजीसीए'च्या नव्या नियमांनुसार ही विमाने चालवण्यासाठी "युनिक आयडेंटिफिकेशन पिन' घ्यावा लागेल. मानवरहित विमान चालवण्याचा परवानाही आवश्‍यक असेल. ही विमाने चालवणाऱ्यांचे वय किमान 18 वर्षे असावे, अशीही अट आहे. मात्र "डीजीसीए'ने हे नियम का केले, याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. यापूर्वी काही घडलेल्या दुर्घटनांमुळे असे निर्बंध घालण्याची गरज निर्माण झाली, असे काही एरो मॉडेलर सांगतात. 

"डीजीसीए'ने मानवरहित विमानांच्या श्रेणीत अशा मॉडेल एअरक्राफ्टसाठी वेगळी उपश्रेणी करावी. त्यात केवळ क्रीडा, मनोरंजन व शैक्षणिक उद्देशाने चालवली जाणारी विमाने समाविष्ट करावीत. या गटात व्यावसायिक तत्त्वावर चालवली जाणारी विमाने नसावीत, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. अशी विमाने चालवणाऱ्यांची सर्व माहिती स्थानिक क्‍लबने नोंदवून ठेवावी, ती चालवण्याची संमती अल्पवयीन मुलांनाही असावी. विमानांचे वजन व त्यांची उंची गाठण्याच्या मर्यादेवरील निर्बंधही शिथिल करावेत, अशी मागणी काही एरो मॉडेलर करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com