"रिपब्लिकन'च्या बार्शीतील कार्यकारिणीचा राजीनामा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

मुंबई - कोरेगाव भीमामध्ये आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतरही केंद्रीय सामाजिक न्याय व राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोणतीही भूमिका घेतली नसल्याचा आरोप करत रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) बार्शी शहराच्या कार्यकारिणीने राजीनामा दिला आहे. सत्तेत असतानाही दलितांवरील अन्यायाला वाचा फुटत नसल्याचे पत्रही कार्यकारिणी सदस्यांनी आठवले यांना लिहिले आहे. 

कार्यकारिणी सदस्यांनी पत्रात म्हटले आहे, की कोरेगाव भीमामधील घटनेनंतर सत्तेचा उपयोग करून तुम्ही कार्यकर्त्यांना बळ देणे गरजेचे होते; पण सत्तेत असतानाही अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला नाही. या घटनेबाबतही प्रतिक्रिया दिली नाही. या घटनेविरोधात बोलले जात असताना प्रत्युत्तरही दिले नाहीत. त्यामुळे आम्हाला पक्षाचे काम करायचे नसल्याने आम्ही राजीनामा देत आहोत.

Web Title: maharashtra news RPI barshi