माघ शुद्ध दशमी सोहळा सामवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

पुणे - संत तुकाराम महाराज यांच्या अनुग्रह दिनानिमित्ताने मावळ तालुक्‍यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे होत असलेल्या माघ शुद्ध दशमी सप्ताह सोहळ्याचे प्रक्षेपण ‘साम’ वाहिनीवर दररोज दुपारी २.३० वाजता होईल. पुढील मंगळवारपर्यंत (ता. ३०) हे प्रक्षेपण होणार आहे. या कार्यक्रमाचे पुनःप्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता होईल.

संत तुकाराम महाराजांची साधनाभूमी असलेल्या भंडारा डोंगरावर होणाऱ्या या सोहळ्यात काकडा, संत तुकाराम महाराज गाथा पारायण, भजन, संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र, हरिपाठ, कीर्तन, जागर असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवार (ता. २७) हा माघ शुद्ध दशमी सोहळ्याचा मुख्य दिवस आहे.

या सप्ताहात डॉ. विकासानंद मिसाळ हे ज्ञानेश्वरी चरित्र सांगणार आहे. तसेच माउली महाराज कदम, जयवंत महाराज बोधले, आसाराम महाराज बढे, मदन महाराज गोसावी, प्रमोद महाराज जगताप, चैतन्य महाराज देगलूरकर, उद्धव महाराज मंडलिक, डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांची कीर्तने होणार आहे. सप्ताहातील सर्व कार्यक्रम तसेच श्री विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम महाराज, भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती ‘साम’वरील विशेष मालिकेत प्रक्षेपित करण्यात येणार आहे. राज्यातील भाविकांना हा सोहळा ‘साम’ वाहिनीवरून घरबसल्या पाहता येणार आहे.

Web Title: maharashtra news saam tv sant tukaram maharaj