सदाभाऊ हाजिर व्हा; स्वाभिमानीची नोटीस

सोमवार, 3 जुलै 2017

गेल्या कित्येक दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील खासदार राजू शेट्टी विरूध्द राज्यमंत्री सदाभाऊ खोत वाद निर्णायक टप्प्यात आला आहे. स्वाभिमानी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत सदाभाऊंविरोधात अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सदाभाऊंचा जाब विचारण्याची मागणी केली होती.

मुंबई - पक्ष संघटनेच्या विरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना बाजू मांडण्यासाठी हजर होण्याची नोटीस पाठवली आहे. पुणे येथे शासकीय विश्रामगृहात 4 जुलैला चर्चेसाठी हजर राहत आपले म्हणणे मांडण्याची सूचना नोटिशीद्वारे करण्यात आली आहे.

गेल्या कित्येक दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील खासदार राजू शेट्टी विरूध्द राज्यमंत्री सदाभाऊ खोत वाद निर्णायक टप्प्यात आला आहे. स्वाभिमानी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत सदाभाऊंविरोधात अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सदाभाऊंचा जाब विचारण्याची मागणी केली होती. राज्य कार्यकारिणी बैठकीनंतर राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक व वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे सदाभाऊंच्या बाबत काय निर्णय करायचा याचा दबाव कार्यकारणीवरही आला.

त्यामुळे या कार्यकारणीच्या बैठकीतच राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे ठरवण्यासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. या चार सदस्यीय समितीने 4 जुलैपर्यंत सदाभाऊ खोत यांची बाजू ऐकून घेत चर्चा करुन निर्णय घ्यावा, असे बैठकीत ठरवण्यात आले होते. त्यामुळे 4 जुलैला सदाभाऊंची बाजू ऐकण्यासाठी संघटनेने हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्य कार्यकारणीच्या बैठकिचे निमंत्रणही सदाभाऊ खोत यांना देण्यात आले नसल्याचे समजते. सदाभाऊ खोत यांच्या विरोधात स्वाभिमानीमध्ये तक्रारी वाढत असल्याने त्याच बैठकित खोत यांना निलंबित करण्याची मागणीही काही सदस्यांनी केली होती. मात्र, पुढे जावून बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचा कांगावा सदाभाऊ खोत यांना करण्याची संधी मिळू नये म्हणूनच हा चौकशीचा घाट घातला आहे. मात्र, सदाभाऊंची हकालपट्टी अटळ असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

सरकारनामा साईटवरील राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा:
नौटंकी निरूपम यांच्या  हाती लवकर नारळ द्या !
सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांचे आरक्षणाला आव्हान​
जीएसटीमुळे विकासाला कोलदांडा​
पुणे काँग्रेसमध्ये स्वतंत्र पालिकेवरून टोलवा-टोलवी​
झुणका-भाकर केंद्र योजना सुरू करण्याची शिफारस : उद्धव ठाकरे​
हेडमास्तर योगेश गोगावलेंकडून पुणे भाजप नगरसेवकांची हजेरी​

Web Title: Maharashtra news sadabhau khot and raju shetty dispute in swabhimani shetkari sanghtna